मेट्रोच्या जागा तातडीने ताब्यात घ्या - अजित पवार 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे; मात्र भूसंपादनाअभावी वर्षभरानंतरही हे काम सुरू झालेले नाही.

पुणे- हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानच्या मेट्रो प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेल्या जागांचे तातडीने भूसंपादन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिल्या. 

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे; मात्र भूसंपादनाअभावी वर्षभरानंतरही हे काम सुरू झालेले नाही. आज उपमुख्यमंत्री पवार यांनी "पीएमआरडीए' आणि महामेट्रोच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. "पीएमआरडीए'च्या मेट्रो प्रकल्पासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणच्या सुमारे 28 हेक्‍टर जागेचे भूसंपादन करायचे आहे. त्यापैकी सत्तर टक्केच जागेचे भूसंपादन झाले आहे. नव्वद टक्के जागा ताब्यात आल्याशिवाय प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार नसल्याचे टाटा-सिमेन्स या कंपनीने सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रकल्पासाठी हिंजवडी येथे कारशेड उभारण्यासाठी पाच हेक्‍टर, तर यशदा येथे स्टील यार्ड उभारण्यासाठी पाच हेक्‍टर, याशिवाय शिवाजीनगर येथील कामगार पुतळा झोपडपट्टीच्या जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. तसेच काही शासकीय जागाही ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. त्या संदर्भात पवार यांनी संबंधित विभागांना तातडीने जागा ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar on Thursday directed that land acquisition for Metro project should be done immediately