Ajit Pawar : बारामतीत गुंडगिरी खपवून घेणार नाही, प्रसंगी माेका लावू : उपमुख्यमंत्री अजित पवार; युवकाला चार जणांकडून मारहाण प्रकरण
Baramati : दोन दिवसांपूर्वी एका युवकाला चार जणांनी जी बेदम मारहाण केली, त्याची व्हिडीओ क्लिप मी पाहिली. असली गुंडगिरी आणि दादागिरी मी खपवून घेणार नाही. पोलिसांना सांगून त्याच्यावर योग्य ती कलमे लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बारामती : कसलीही दादागिरी, गुंडगिरी बारामती खपवून घेणार नाही, शहरात गुंडगिरी करणा-यांवर प्रसंगी माेकाची कारवाई करु, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. बारामती पंचायत समितीत रविवारी झालेल्या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी हा इशारा दिला.