Ajit Pawar tribute
sakal
पुणे : ‘गेली ४० वर्षे अविरतपणे सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत सर्वसामान्यांसाठी काम करणारे व ‘कामाचा माणूस अशी ओळख व विकासाचा ध्यास असलेला धुरंधर नेता आपल्यातून हरपला आहे. केवळ कामाचा विचार, वक्तशीरपणा, दूरदर्शीपणा, कडक शिस्त असणारे अजित पवार यांनी सुरू केलेले पुण्यातील चालू विकासकामे पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. या माध्यमातून त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल,’ अशा भावना ‘मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशन’ (एमईए) तर्फे ‘बीएमसीसी’ रस्त्यावरील ‘सारथी’ इमारतीच्या सभागृहात आयोजित श्रद्धांजली सभेत असोसिएशनचे सदस्य, पदाधिकारी यांनी शनिवारी व्यक्त केल्या.