घोरपडीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद
घोरपडी : बी. टी. कवडे रस्त्यावरील व्यापाऱ्यांकडून दोन दिवस दुकाने बंद ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व्यापाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत बुधवारी आणि गुरुवारी स्वेच्छेने सर्व व्यवहार बंद ठेवले होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती, अशी माहिती बी. टी. कवडे रस्ता व्यापारी संघटनेचे सचिव रिझवान खान यांनी दिली. दिवसभर सर्व व्यवहार बंद असल्याने परिसरातील रस्त्यांवर तुरळक वर्दळ होती. दरम्यान, नगरसेविका सुरेखा कवडे यांच्या कार्यालयाबाहेर अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

