पिंपोडे बुद्रुक दादांशिवाय जिल्हा परिषद निवडणुका
पिंपोडे परिसरात अजितदादांच्या स्मृतींना उजाळा
पिंपोडे बुद्रुक, ता. २९ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच काल सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. दरम्यान, सर्वपक्षीय उमेदवारांनी निवडणुकीचा प्रचार थांबवला. काल पिंपोडे बुद्रुक, सोनके, करंजखोप, वाघोलीसह परिसरात नागरिकांकडून बंद पाळण्यात आला. आज विविध गावांमध्ये शोकसभा झाली. यावेळी अनेकांनी अजितदादांच्या स्मृतीला उजाळा दिला. ‘विजयी गुलाल’ हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याची भावना राष्ट्रवादीच्या समर्थकांनी व्यक्त केली.
‘दादा गेले...’ ही बातमी कळताच काल संपूर्ण उत्तर कोरेगाव जणू थांबून गेलं. क्षणात परिसरात शोककळा पसरली. रस्ते ओस पडले, चौक सुन्न झाले, घराघरांत शांत वेदना दाटल्या. अजितदादांनी उत्तर कोरेगावच्या विकासासाठी स्वतःला झोकून दिले होते. निधनाची बातमी समजताच स्थानिक व्यापारी, नागरिक आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते चौकात जमा झाले. येथे आयोजित विशेष शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. ऐनवेळी निवडणुकीच्या धामधुमीत सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराच्या गाड्यांची चाकं थांबवली. स्पीकरचा आवाज बंद झाला.
दादांची सभा म्हणजे खमक्या हेडमास्तरचा क्लासच होता. ज्या गावात सभा तेथील २५-३० जणांची नाव ते एका सुरात घेत. दादांच्या तोंडून नाव ऐकलं, की कार्यकर्त्याला दहा हत्तीचं बळ यायचं. पिंपोडे गटात अजितदादांची सभा होणार, म्हणून उमेदवारांसह सर्वजण त्यांच्या प्रतीक्षेत होती. दादांची सभा म्हणजे विजयावर शिक्कामोर्तब अशी उमेदवारांची समजूत. जवळपास नऊ वर्षांनी ग्रामीण भागातील निवडणुकांना सुरुवात झाली होती. इच्छुकांची संख्या मोठी होती. आपला कामाचा माणूस येणार आणि आपल्याला जिंकून देणार, अशी सर्वांची अपेक्षा होती.
V90939
नांदवळ ः अजित पवार यांच्या शोकसभेस जमलेले ग्रामस्थ. (राहुल लेंभे ः सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

