
पिंपरी : ‘‘पावसाचे दिवस संपल्यानंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. चार सदस्यांच्या प्रभागानेच ही रचना असेल. लोकसंख्या अधिक असल्याने मुंबईत मात्र एक प्रभाग रचना असेल. त्यामुळे आजपासूनच कामाला लागा,’’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केल्या.