Ajit Pawar: विद्यार्थ्यांनी कौशल्य वाढीवर भर द्यावा; उपमुख्यमंत्री अजित पवार, पाच हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
Skill Development: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना एआय आणि कौशल्य विकासाच्या शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले. महाळुंगे येथे ५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
औंध : ‘‘प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धेसह कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) वाढलेले प्रमाण पाहता विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कृत्रिम बुद्धिमत्ता लक्षात घेऊन, कौशल्यवाढीच्या शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.