
बारामती : पुढील पाच वर्षांत बारामतीला देशातील सर्वात अग्रेसर मतदार संघ म्हणून नावलौकिक प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करीन, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल बारामतीकरांच्या वतीने रविवारी (ता. 22) अजित पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना अजित पवार यांनीही ग्वाही दिली.