पुणे - आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत आणि राजकीय गणिते लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही शहर कार्यकारिणीच्या रचनेत मोठा बदल केला आहे. दोन शहराध्यक्ष आणि चार कार्याध्यक्षांची निवड करून वेगळा संदेश दिला आहे.
महायुतीमधील इतर पक्षांचे अनुकरण करतानाच पक्षातील अनुभव, संघटन कौशल्य, आक्रमकता आणि पक्ष विस्ताराला बळकटी देणाऱ्या चेहऱ्यांची निवड करत महापालिका निवडणुकीत आपला बालेकिल्ला राखण्यासाठी राष्ट्रवादीने चांगलीच कंबर कसत ‘डबल’ शहराध्यक्ष पदाचा अनोखा ‘डाव’ टाकला आहे.