आसू : फलटण फेस्टिव्हलच्या ग्रुप डान्स स्पर्धेत आकाश कला केंद्र प्रथम

आसू : फलटण फेस्टिव्हलच्या ग्रुप डान्स स्पर्धेत आकाश कला केंद्र प्रथम
Published on: 

साताऱ्याचे आकाश कला केंद्र प्रथम

फलटण फेस्टिव्हलमध्ये ग्रुप डान्स स्पर्धेस प्रतिसाद


आसू, ता. २७ : श्री सद्‍गुरू प्रतिष्ठान आयोजित ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’मध्ये झालेल्या ग्रुप डान्स स्पर्धेत साताऱ्यातील आकाश कला केंद्राने प्रथम, फलटणच्या नृत्य कला ॲकॅडमीने द्वितीय तर, अल्फा ग्रुपने तृतीय क्रमांक मिळविला.

स्वयंसिद्धा संस्था समूहाच्या प्रमुख अ‍ॅड. मधुबाला भोसले यांच्या हस्ते विजेत्यांसह सहभागी कलाकारांचा गौरव झाला. ग्रुप डान्स स्पर्धेचा मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी चंदुकाका सराफच्या फलटणचे शाखा व्यवस्थापक श्रीनिवास सूर्यवंशी, फलटण फेस्टिव्हलचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष रणजितसिंह भोसले, उपाध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, तेजसिंह भोसले, जयकुमार शिंदे, धनंजय पवार, संदीप जगताप, प्रवीण पवार, निखिल मोरे, अमित कांबळे उपस्थित होते.
स्पर्धेतील विविध शाळा, डान्स ॲकॅडमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या बहारदार नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी फलटणच्या उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले, नगरसेविका रूपाली सस्ते, स्वयंसिद्धा कल्चरल ग्रुपच्या संचालिका राजस भोईटे, अलका बेडकीहाळ, स्वाती फुले उपस्थित होत्या.
पुणे येथील नृत्यदिग्दर्शक प्रा. गणेश उपाध्याय, बारामती येथील कलाकार सनी पवार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.


03362
फलटण : आकाश कला केंद्र ग्रुपला बक्षीस वितरण करताना अ‍ॅड. मधुबाला भोसले, आदी.
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com