महाशिवरात्री निमित्त बार्डी येथे अखंड हरिनाम सप्ताह
महाशिवरात्रीनिमित्त बार्डीत अखंड हरिनाम सप्ताह
..........
करकंब : महाशिवरात्रीनिमित्त बार्डी (ता. पंढरपूर) येथील महादेव मंदिरात शुक्रवारी (ता. ६) ते सोमवार (ता. १०) या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बालयोगी सुखदेव महाराजांच्या हस्ते कलशपूजन आणि गुरुवर्य सुदमजी पिसे महाराज यांच्या हस्ते ध्वजपूजन होऊन सप्ताहाची सुरवात होणार आहे. सप्ताह काळात दररोज पहाटे चार वाजता काकडा आरती, सहा वाजता अभिषेक, सात वाजता ज्ञानेश्वरी पारायण, अकरा वाजता भोजन, बारा वाजता गाथा भजन, सायंकाळी साडेपाच वाजता प्रवचन, साडेसात वाजता हरिपाठ, साडेआठ वाजता हरिकीर्तन असे आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत. दररोज रात्री होणाऱ्या कीर्तन सेवेमध्ये ह.भ.प. सूर्याजी भोसले, ज्ञानेश्वर कदम, विनोदाचार्य सोपान इंगळे, अंकुश रणखांबे, ज्ञानसिंधु सागर बोराडे, गायनाचार्य कविराज झावरे, विद्यावाचस्पती जलाल सय्यद, उल्हास सूर्यवंशी, मोहन पाटील, सतीश कदम यांची कीर्तने होणार आहे. तर रविवारी (ता. ८) श्रीसंत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त श्रीहरी महाराज साळुंखे यांचे तर बुधवारी (ता. ११) दासनवमीनिमित्त उमराव महाराज देवकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

