

चौपाड विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्रीमद् भागवत कथा अन् कीर्तन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १९ : चौपाड विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होणार आहे. चौपाड विठ्ठल मंदिरातील शनी मंदिर, महादेव, मंगळ व नागनाथ मंदिराचे नूतनीकरण सुरू असून, या कार्यासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.
------------------------
दैनंदिन कार्यक्रम
पहाटे ५ ते ६ : काकड आरती
सकाळी ६ ते ७ : श्रींची पूजा व आरती
सकाळी ७ ते १० : श्री ज्ञानेश्वरी पारायण
सकाळी १० ते ११ : श्री ज्ञानेश्वर महाराज गाथा भजन
दुपारी २ ते ५ : श्रीमद् भागवत कथा (ह.भ.प. इंगळे महाराज)
सायंकाळी ५.३० ते ६.३० : महिला भजनी मंडळ व वाद्यवृंद संगीत
सायंकाळी ६.३० ते ८.३० : हरिपाठ, भजन व कीर्तन
रात्री ८.३० ते १० : महाप्रसाद
------------------------
दिवसनिहाय भजन, कीर्तन, अवतार सेवा
२९ ऑगस्ट : वीर गणपती महिला भजनी मंडळ- ह.भ.प. पुरुषोत्तम सुरवसे महाराज-मत्स्य अवतार
३० ऑगस्ट : ज्ञानेश्वर माऊली प्र. भजनी मंडळ- ह.भ.प. दादा रसाळ महाराज- कूर्म अवतार
३१ ऑगस्ट : न्यू लक्ष्मी महिला भजनी मंडळ- ह.भ.प. बाळासाहेब घटे महाराज- वराह अवतार
१ सप्टेंबर : पाणीवेस महिला भजनी मंडळ - ह.भ.प. शंभू गुंड महाराज- नरसिंह अवतार
२ सप्टेंबर : यशश्री महिला भजनी मंडळ - ह.भ.प. आदर्श इंगळे महाराज- वामन अवतार
३ सप्टेंबर : चौपाड विठ्ठल महिला भजनी मंडळ- ह.भ.प. तानाजी बोलेराव महाराज - परशुराम अवतार
४ सप्टेंबर : गणेश विठ्ठल भजनी मंडळ- ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज
-----------------
विशेष कीर्तन अन् पारायण
गुलालाचे कीर्तन : ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज
काल्याचे कीर्तन : ह.भ.प. शिवानंद जाधव महाराज
-----------------
विशेष उपक्रम : दररोज सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत कुलकर्णी व समस्त श्री स्वामी समर्थ वारकरी शिक्षण संस्थेच्या सहकार्याने हरिपाठ होईल. तसेच लीला कांताप्रसाद काबरा यांच्या रसाळ वाणीतून ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.