अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने ॲड. सचिन चौधरी यांचा स्वराज्य रक्षक पुरस्काराने सन्मान

इंदापूर पोलीसांनी शिवभक्तांवर खटला दाखल केल्याने सकलमराठा समाजाच्या वतीने अँड.सचिन चौधरी यांना कायदेशीर प्रक्रीयेची जबाबदारी देण्यात आली होती
Akhil Bharatiya Maratha Seva Sangh Sachin Chaudhary honored with Swarajya Rakshak Award indapur
Akhil Bharatiya Maratha Seva Sangh Sachin Chaudhary honored with Swarajya Rakshak Award indapur sakal

इंदापूर : अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने ॲड. सचिन चौधरी यांचा शंभुराजे युवा क्रांतीसंघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील मोरे, नगरसेवक अमर गाडे व अतुल शेटे पाटील, प्रशांत उंबरे, रविंद्र सरडे, प्रविण पवार यांच्या हस्ते स्वराज्य रक्षक पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ऍड रणजित बाबर पाटील, ऍड अवधूत डोंगरे, महेंद्र रेडके,श्रीनिवास शेळके, सुभाष बोंगाणे, गोरख शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुनिल मोरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात विकृत, बदनामीकारक लिखाण करणाऱ्या जेम्स लेन या लेखका विरुध्द इंदापूर तालुक्यातील शिवप्रेमीनीं सन २०१३ मध्ये आंदोलन केले होते.

त्यामुळे इंदापूर पोलीसांनी शिवभक्तांवर खटला दाखल केल्याने सकलमराठा समाजाच्या वतीने अँड.सचिन चौधरी यांना कायदेशीर प्रक्रीयेची जबाबदारी देण्यात आली होती.त्याप्रमाणे त्यांनी अनेक कार्यकर्त्यांचे विना शुल्क जामीन व खटल्याचे कामकाज पाहिले. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे खटला मागे घेण्यात यावा याकरिता त्यांनी सातत्यानेपाठपुरावा केल्यामुळे खटला रद्द झाला.ही बाब अँड.चौधरी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देवूनसर्वांचे खटले रद्द करून समाजाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली.त्यामुळे त्यांना स्वराज्य रक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष कृष्णाजी ताटे, गट नेते कैलास कदम,नगरसेवक अमर गाडे,अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्षपवन घोगरे, गोरख शिंदे, मारुती मारकड आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पवार तर सूत्रसंचलन विजयकुमार फलफले यांनी मानले. आभार संघाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com