मेधाताई मिळवून देणार का चंद्रकांतदादांना ब्राह्मणांचा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 October 2019

ब्राह्मण महासंघाच्या 17 संघटना चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देणार असल्याचे समजते. नारायण पेठेत या संदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी मांडलेल्या भूमिकेवर यावर चर्चा करण्यात येणार आहे.

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या नाट्यमय घडामोडीनंतर ब्राह्मण महासंघ व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

ब्राह्मण महासंघाच्या 17 संघटना चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देणार असल्याचे समजते. नारायण पेठेत या संदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी मांडलेल्या भूमिकेवर यावर चर्चा करण्यात येणार आहे. या सर्व घडामोडींमध्ये ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांचे निलंबन केले आहे. 

चंद्रकात पाटील यांची कोथरूडमधील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ब्राह्मण महासंघाने त्यांना विरोध केला होता. मेधा कुलकर्णींचे तिकीट नाकारल्याने त्यांनीही नाराजी दर्शविली होती. पण, मेधा कुलकर्णी यांनी चंद्रकांतदादांना नंतर पाठिंबा जाहीर करत त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असे म्हटले. आता ब्राह्मण महासंघाशीही ते बोलणी करत चंद्रकांत पाटलांच्या पाठिशी उभी राहणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Brahman Mahasangh may be supports Chandrakant Patil in Kothrud