अक्कलकोट येथे दर्शनासाठी भक्तांची तुडुंब गर्दी, पाडव्यानंतर गर्दीस प्रारंभ , वाहतूक व्यवस्था कोलमडलीवाहतूक व्यवस्था कळंबोली

अक्कलकोट येथे दर्शनासाठी भक्तांची तुडुंब गर्दी, पाडव्यानंतर गर्दीस प्रारंभ , वाहतूक व्यवस्था कोलमडलीवाहतूक व्यवस्था कळंबोली
Published on: 

AKK26B06564, AKK26B06562
अक्कलकोट ः वटवृक्ष मंदिरातील प्रसन्न गाभारा.
वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी झालेली भाविकांची तुडुंब गर्दी.

स्वामीभक्तांची गर्दी; अक्कलकोटमध्ये वाहतुकीचा बोजवारा
पार्किंग फुल्ल; रस्त्यांवर वाहनांच्या रांगा; वाहतूक पोलिसांच्या नियोजनावर भक्तांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट शहर, ता. १३ : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी दिवाळीच्या सुट्ट्यांमधील शेवटच्या चार-पाच दिवसांत अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. बुधवारी शेकडो वाहनांतून स्वामीभक्त अक्कलकोटमध्ये दाखल झाले. भाविकांची गर्दी आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहतूक पोलिस अस्तित्वात आहेत की नाही, असा सवाल स्वामीभक्तांकडून उपस्थित केला जात आहे.

दिवाळी पाडव्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून दर्शनासाठी स्वामीभक्तांची अलोट गर्दी होत आहे. शहरातील विविध ठिकाणची पार्किंग व्यवस्था पूर्ण भरली असून, निवासाची व्यवस्थाही हाउसफुल झाली आहे. वटवृक्ष मंदिरात दक्षिणद्वारातून स्वामीभक्तांना प्रवेश दिला जात आहे. मुख्य दरवाजापासून भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काकड आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी रांगेत सोडण्यात येते. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा असल्याने दर्शन घेणे सुलभ होत आहे. स्वामीभक्तांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, आत्माराम घाटगे, महेश गोगी, श्रीशैल गवंडी आदी प्रयत्नशील आहेत.
दोन दिवसांपासून वाढलेल्या गर्दीमुळे भाविकांसह स्थानिक नागरिकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विविध ठिकाणची पार्किंग व्यवस्था पूर्ण भरल्याने चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला लावण्यात आली. सुरुवातीला राजे फत्तेसिंह चौकात बॅरिकेट्स न लावल्याने अनेक चारचाकी वाहने थेट मंदिर परिसर आणि बेडर कन्हैया चौकापर्यंत येत होती.
श्रीमंत कमलाराजे चौकातील पार्किंग व्यवस्था पूर्ण भरल्याने एवन चौकापासून प्रियदर्शिनी सांस्कृतिक भवन परिसरापर्यंत असंख्य वाहने लावण्यात आली होती. परिणामी, या भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. मैंदर्गी रोड, बासलेगाव रोड तसेच मंगरूळ चौक ते बेडर कन्हैया चौक या मार्गांवरही वाहने अस्ताव्यस्त लावण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली.
वाहतूक व्यवस्थेकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. कारंजा चौक, श्रीमंत कमलाराजे चौक आणि राजे फत्तेसिंह चौक येथे उशिराने बॅरिकेट्स लावण्यात आल्याने दोन दिवस वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला.
---------
संयुक्त बैठक घेण्याची मागणी
अक्कलकोट शहरातील गर्दी आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी पोलिस प्रशासन, तहसील कार्यालय, नगरपालिका आणि धार्मिक संस्था व देवस्थान यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी, अशी मागणी स्वामीभक्तांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.