अक्कलकोटमधील अतिक्रमण केलेल्या दुकानदारावर नगरपालिकेची कारवाई, ३७ अतिक्रमण हटविले, सावरकर चौकाने घेतला मोकळा श्वास

अक्कलकोटमधील अतिक्रमण केलेल्या दुकानदारावर नगरपालिकेची कारवाई, ३७ अतिक्रमण हटविले, सावरकर चौकाने घेतला मोकळा श्वास

Published on

AKK26B05934
अक्कलकोट : शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने हटविताना नगरपालिका पथक.
---
सावरकर चाैकाने घेतला मोकळा श्वास
अक्कलकोटमध्ये ३७ अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा
अक्कलकोट, ता. ५ : अक्कलकोट नगरपालिकेने शहरातील अतिक्रमणांविरोधात पुन्हा मोहीम हाती घेत, बुधवारी (ता. ४) सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, आडत बाजार व फुलारी कट्टा परिसरातील अतिक्रमण हटविले. या कारवाईत नाल्यावर व रस्त्याला अडथळा ठरणारी ३७ अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच काही दुकानदारांनी गटारीवर केलेल्या पायऱ्या जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आल्या. या कारवाईमुळे सावरकर चौक परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.
शहरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे स्वच्छतेच्या कामात अडथळे निर्माण होत होते. काही व्यापाऱ्यांनी नाल्यावर फरशा व पायऱ्या टाकल्यामुळे नाले स्वच्छता करणे कठीण झाले होते. त्यामुळे रस्ते मोकळे करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आल्याचे नगरपालिकेकडून सांगण्यात आले.
या मोहिमेत मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगर रचनाकार शुभम माहुरे, नगर अभियंता अमोल भामरे, अभिषेक काकडे, शुभम माने, बालाजी पारखे, सायली मुंगसे आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भिताडे यांच्यासह सुमारे ४० पोलिस कर्मचारी आणि नगरपालिकेचे २० कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.
शहरातील मुख्य बाजारपेठ, कापड लाइन, कारंजा चौक व बसस्थानक परिसरात रस्त्याला अडथळा ठरणारी अतिक्रमणे प्राधान्याने हटविण्यात येत आहेत. अनेक दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालत जावे लागत असल्याची तक्रार होती.
---
चौकट
अतिक्रमण स्वतःहून काढा : मुख्याधिकारी डाके
शहरातील व्यापारी व दुकानदारांनी अतिक्रमणे स्वतःहून काढून अक्कलकोटच्या विकासासाठी नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com