अक्कलकोट शहरातील जुना वाडा आग लागल्याने जळून खाक, जीवित हानी नाही,

अक्कलकोट शहरातील जुना वाडा आग लागल्याने जळून खाक, जीवित हानी नाही,

Published on

AKK26B05932
अक्कलकोट ः शहरातील जुन्या वाड्यास लागलेली आग.

अक्कलकोटमध्ये जुन्या वाड्यास आग
अक्कलकोट, ता. ४ ः येथील समर्थ चौकातील श्रीनिवास सिंदगीकर यांच्या जुन्या वाड्यात मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने नुकसान झाले असले तरी कुठलीही जीवितहानी झाली नाही.

अक्कलकोट शहरातील मध्यवर्ती समर्थ चौक येथील सिंदगीकर यांच्या जुना वाडा असून ते तेथे राहण्यास होते. मध्यंतरी सर्व वाड्याची पडझड झाल्याने ते त्यांच्या दुसऱ्या ठिकाणच्या जागेत राहण्यास आहेत. मंगळवारी पहाटेच्या सुमारास रात्र अडीच ते तीनच्या दरम्यान धूर येत असल्याचे लगतचे रहिवासी शाहरुख शिकलगार यांनी पाहिले. गल्लीतील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. नगरसेवक महेश हिंडोळे, देविदास कवटगे, आरोग्य सभापती अविनाश मडीखांबे, सद्दाम शेरीकर, नन्नू कोरबू यांनी नगर परिषदेची अग्निशमन गाडी बोलावली. अग्निशमनच्या जवानांनी दोन तासांत ४ बंब पाणी मारून सकाळी ६ वाजता आग आटोक्यात आणली. तहसील प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com