अक्कलकोट येथे दोन गटात हाणामारी व ५० हजार काढून घेतले, दोन्ही गटाचे परस्परविरोधी तक्रार, १४ जणांना अटक व दोन जखमी

अक्कलकोट येथे दोन गटात हाणामारी  व ५० हजार  काढून घेतले, दोन्ही गटाचे परस्परविरोधी तक्रार, १४ जणांना अटक व दोन जखमी
Published on

अक्कलकोटमध्ये दोन गटांत मध्यरात्री हाणामारी
दोन्ही गटांतील १४ जण अटकेत; परस्परविरोधी गुन्हे दाखल

सोलापूर, ता. १८ : अक्कलकोट शहरात रविवारी मध्यरात्री दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोघेजण जखमी झाले असून, दोन्ही गटांतील १४ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही गटांनी एकमेकांवर ५० हजार रुपये हिसकावून घेतल्याचा आरोप केला आहे.
या हाणामारीची पहिली फिर्याद महांतेश उर्फ राहुल बलभीम वाडे (वय २७, रा. आझाद गल्ली, अक्कलकोट) यांनी दिली आहे. त्यानुसार सनी सोनटक्के, विनायक पाटील, पिंटू उर्फ श्रीकृष्ण वायचळ, वैभव गवळी, महेश जमादार, आदित्य शिंदे, ओंकार देशमुख व विजय इंगळे (सर्व रा. अक्कलकोट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मोटारसायकलवरून घरी जात असताना सर्जेराव मंगल कार्यालयाजवळील अजंठा पान शॉपसमोर त्यांचा रस्ता अडवून मारहाण करण्यात आली व खिशातील ५० हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद विजय गणेश इंगळे (वय ३०, व्यवसाय- पेढा व्यापार, रा. फत्तेसिंह चौक, अक्कलकोट) यांनी दिली आहे. त्यानुसार राहुल वाडे, अभिजित बकरे, प्रसन्न गवंडी, सुरज मसरे, त्याचा एक कामगार, समर्थ आडवितोटे, अमर मसरे यांच्यासह नऊ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी तलवारी व कुऱ्हाडी घेऊन फिर्यादीच्या कारला घेराव घालत काचा फोडल्या. त्यानंतर अपहरणाच्या उद्देशाने शेतात नेऊन पँटच्या खिशातील ५० हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार राजकुमार कोळी, तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बागाव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

₹1 Lakh Crore Infrastructure Push in Solapur District, Says Nitin Gadkari
Nitin Gadkari
Massive Infrastructure Push: Gadkari to Launch Projects Worth ₹2784 Crore in Akkalkot
माध्यमिक शालांत परीक्षेचा अक्कलकोट तालुक्याचा ८१.१२% निकाल,  मंगरूळ प्रशालेचा कृष्णा सुरवसे ९७.८०% मिळवून तालुक्यात प्रथम, श्री शहाजी प्रशालेची प्रणया साळुंखे ९७.२० मिळवून तालुक्यात द्वितीय
Marathi News Esakal
www.esakal.com