

AKK26B06093
कृष्णा सुरवसे
---
AKK26B06094
प्रणया साळुंखे
---
कृष्णा सुरवसे अक्कलकोट तालुक्यात प्रथम
एकूण निकाल ८१.१२ टक्के; सहा शाळांचा शंभर टक्के निकाल
सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट, ता. ८ : माध्यमिक शालांत परीक्षेचा अक्कलकोट तालुक्याचा निकाल ८१.१२ टक्के लागला आहे. केएलई संचलित मंगरूळे माध्यमिक प्रशालेचा कृष्णा प्रकाश सुरवसे हा ९७.८० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम आला आहे. मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलची विद्यार्थिनी प्रणया साळुंखे हिने ९७.२० टक्के गुण मिळवत तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तालुक्यातील सहा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
तालुक्यातून एकूण ४ हजार १२३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३ हजार २७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ४३६ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले असून ८५६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १ हजार १३३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ८४५ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
---
शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा
स्वामी समर्थ प्रशाला, आरळी; शंभू महादेव विद्यामंदिर, गोळसगाव (कन्नड माध्यम); इंडियन मॉडेल स्कूल, अक्कलकोट; शासकीय निवासी शाळा, अक्कलकोट; केशव याबाजी इंग्लिश मीडियम स्कूल, तडवळ व विश्व ॲकॅडमी इंटरनॅशनल स्कूल, शिवपुरी.
---
मंगरूळे प्रशालेचे यश
केएलई संचलित मंगरूळे माध्यमिक प्रशालेचा निकाल ९७ टक्के लागला आहे. कृष्णा सुरवसे याने ९७.८० टक्के गुण मिळवत प्रशालेसह तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. शांभवी आजगुंडे हिने ९६.४० टक्के गुणांसह द्वितीय तर विश्वेश घेवारे याने ९४.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. प्रशालेतून २७५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ६९ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे.
---
तालुक्यातील शाळांची निकालाची टक्केवारी
ग्रामीण विद्या विकास प्रशाला, चपळगाव (७७.५५), श्री बसवराज माध्यमिक प्रशाला, करजगी (७४.६८), श्री शिवचलेश्वर हायस्कूल, मैंदर्गी (८०.२०), एस. जी. परमशेट्टी हायस्कूल, दुधनी (८०.४०), नूतन विद्यालय, मंगरूळ (९४.११), एस. एस. शेळके प्रशाला, वागदरी (७३.२८), अँग्लो उर्दू हायस्कूल, अक्कलकोट (८९), मराठा मंदिर श्रीमंत राणी निर्मलाराजे कन्या प्रशाला (८५.७१), श्री काशी विश्वेश्वर हायस्कूल, जेऊर (८७.९०), एच. जी. प्रचंडे हायस्कूल, नागणसूर (८१.१७), शाब्दी उर्दू हायस्कूल, मैंदर्गी (८५.८०), सौ. सुरेखा कल्याणशेट्टी हायस्कूल, अक्कलकोट (८७.५०), बसवेश्वर प्रशाला, काझीकणबस (९३.३३) व मातोश्री निलव्वाबाई खेडगी प्रशाला, अक्कलकोट (९३ टक्के).
इंडियन मॉडेल स्कूलचा शंभर टक्के निकाल
अक्कलकोट येथील इंडियन मॉडेल स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला आहे. ८० पैकी सर्व ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ६२ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे. अजिंक्य जंगले याने ९६ टक्के गुणांसह प्रथम, मनस्वी इचगे ९५ टक्के गुणांसह द्वितीय तर सहाना गौर, आदर्श वाघमोडे व अदिती पाटील यांनी ९४.४० टक्के गुणांसह संयुक्त तृतीय क्रमांक मिळविला.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित सौ. सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८७.५० टक्के लागला असून सेमी विभागाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कु. नम्रता सुरेश माशाळे हिने ९१.६० टक्के गुणांसह प्रथम, कु. आदिती बानेगाव हिने ८९ टक्के गुणांसह द्वितीय तर कु. विजयालक्ष्मी हिळ्ळी हिने ८८.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.