राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात अक्कलकोटच्या नागनळळी आश्रमशाळेचे यश, राज्यात द्वितीय क्रमांक, राष्ट्रीय स्तरासाठी निवड

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात अक्कलकोटच्या नागनळळी आश्रमशाळेचे यश, राज्यात द्वितीय क्रमांक, राष्ट्रीय स्तरासाठी निवड

Published on

AKK26B05824
नागनळळी (ता. अक्कलकोट) : येथील केएसएम कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी ओंकार फडतरे व महेश टेंगळे यांचा सन्मान करताना मान्यवर.

फडतरे अन् टेंगळेंचा प्रकल्प राज्यात द्वितीय
बहुउपयोगी शेतीयंत्राचे सादरीकरण; राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड
..........
अक्कलकोट, ता. २ : अक्कलकोट तालुक्यातील नागनळळी येथील केएसएम कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी ओंकार फडतरे व महेश टेंगळे यांनी ‘स्मार्ट ॲग्रिकल्चर, कॅटल फार्म व बहुउपयोगी शेतीयंत्र’ हा अभिनव वैज्ञानिक प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पास माध्यमिक गटातून राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला. या यशानंतर त्यांच्या प्रकल्पाची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
राज्य विज्ञान संस्था, नागपूर व श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन (२०२५-२६) २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत नागपूर येथे पार पडले. या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातून माध्यमिक गटातील १११ वैज्ञानिक उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. शालेय शिक्षण, गृहनिर्माण, गृह (ग्रामीण), सहकार व खाण खात्याचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, डॉ. महेंद्र ढोरे, केशवराव मेतकर, डॉ. मिलिंद बाराहते डॉ. राजकुमार अवसरे या मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन ओंकार फडतरे व महेश टेंगळे यांचा गौरवण्यात आला.
विद्यार्थ्यांनी केलेल्या या प्रकल्पामुळे शेती व्यवस्थापन अधिक सुलभ, आधुनिक व कार्यक्षम होते. शिक्षक प्रा. विज्ञान नवले, अमोल पाटील, शंभुलिंग बशेट्टी, वसीम शेख, शुभांगी मिठारे, नूरुद्दीन शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे सचिव जावेद पटेल, प्राचार्य आय. एम. मुजावर, मुख्याध्यापक शेख, गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com