खग्रास (ग्रस्तोदीत) चंद्रग्रहणानिमीत्त  श्री वटवृक्ष स्वामींच्या दिनक्रमात बदल, सायंकाळी ६ ते ८ या वेळेत स्वामी दर्शनकरीता मंदीर बंद राहील

खग्रास (ग्रस्तोदीत) चंद्रग्रहणानिमीत्त श्री वटवृक्ष स्वामींच्या दिनक्रमात बदल, सायंकाळी ६ ते ८ या वेळेत स्वामी दर्शनकरीता मंदीर बंद राहील

Published on

अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे मंदिर
खग्रास चंद्रग्रहण दिवशी दोन तास बंद

सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट, ता. २७ : फाल्गुन शुक्ल पक्ष पौर्णिमा मंगळवार (ता. ३) रोजी रोजी खग्रास (ग्रस्तोदीत) चंद्रग्रहण आहे. खग्रास ग्रहणाचे स्पर्श सायं. ६ वाजून ३१ मिनिटांनी तर मोक्ष सायं. ६ वाजून ४८ मिनिटांनी असल्याने सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत २ तास अक्‍कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर बंद राहील, यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणे दर्शनाकरिता मंदिर उघडण्यात येईल. यानंतर मंदिरात रात्री ७:४५ ते ८:४० यावेळेत नित्यनियमाने होणारी महाराजांची शेजारतीही होणार नाही, अशी माहिती पुरोहित मंदार महाराज पुजारी यांनी दिली.

तसेच भक्तांच्या वतीने सकाळी नित्यनियमाने होणारे अभिषेक व सकाळी ११.३० ची महाराजांची नैवेद्य आरती होणार नाही, परंतु, ग्रहणपर्व काळात दिवसभर ते सायंकाळी ६ पर्यंत स्वामी दर्शन चालू राहील. देवस्थानच्या नित्यक्रमात व स्वामींच्या दिनक्रमात बदल करण्यात आले आहेत.
अक्कलकोट शहर व परिसरात या खग्रास ग्रस्तोदीत चंद्रग्रहणाचे स्पर्श सुर्यास्ताच्यावेळी सायं ६ वाजून ३१ मिनिटांनी तर मोक्ष सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटाला होईल. एकूण १८ मिनीटे खग्रास ग्रस्तोदीत चंद्रग्रहणाचा मुख्य पर्वकाळ राहील. बुधवारी (ता.४) रोजी रोजी पहाटे काकडा-आरती व भाविकांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक या धार्मिक विधींना नेहमीप्रमाणे सुरवात होईल. याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी, अशी माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com