अतिसंवेदनशील मैंदर्गी शहरात अक्कलकोट दक्षिण पोलिसांची विशेष पायी पेट्रोलिंग मोहीम; पोलीस निरीक्षक घुगे यांच्या कारवाईने उपद्रवी लोकांवर वचक

अतिसंवेदनशील मैंदर्गी शहरात अक्कलकोट दक्षिण पोलिसांची विशेष पायी पेट्रोलिंग मोहीम; पोलीस निरीक्षक घुगे यांच्या कारवाईने उपद्रवी लोकांवर वचक
Published on

AKK26B06310
मैंदर्गी (ता. अक्कलकोट) ः अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पायी पेट्रोलिंग मोहीम.

मैंदर्गीत वाहतूक शिस्तीसाठी दक्षिण पोलिसांची विशेष मोहीम
१५ वाहनचालकांवर कारवाई; पानटपऱ्या हटवून फेरीवाल्यांना सूचना

अक्कलकोट, ता. ५ : अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याच्या वतीने बुधवारी मैंदर्गी शहरात पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पायी पेट्रोलिंग मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान वाहतूक शिस्त, अतिक्रमण निर्मूलन आणि नागरिकांमध्ये कायद्याबाबत जनजागृतीवर भर देण्यात आला.
मोहीमेदरम्यान रिक्षा, टमटम, पिकअप तसेच अन्य वाहनचालकांना वाहने निर्धारित पार्किंगस्थळीच उभी करावीत, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि वाहनांची आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगावीत, अशा सूचना देण्यात आल्या.
तसेच दुकानदारांना दुकानासमोर सार्वजनिक रस्त्यावर कोणतेही साहित्य ठेवू नये, अन्यथा संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. फेरीवाल्यांनाही त्यांचे हातगाडे नगरपालिकेने निश्चित केलेल्या जागीच उभे करावेत आणि वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या.
या कारवाईदरम्यान वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १५ वाहनचालकांकडून एकूण सात हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित, शिस्तबद्ध आणि जबाबदार वाहतुकीस सहकार्य करण्याचे आवाहन अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com