अकलूज व परिसर प्रजासत्ताक दिन उत्साहात

अकलूज व परिसर प्रजासत्ताक दिन उत्साहात

Published on

अकलूजमध्ये शाळा, आस्थापनांमध्ये विविध कार्यक्रम

अकलूज, ता. २७ ः अकलूज शहर व परिसरातील शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न स्कूल व एस.एम.पी. इंग्लिश स्कूल व कॉलेज येथे पोलिस उपविभागीय अधिकारी संतोष वाळके यांच्या हस्ते व अध्यक्षा शीतलदेवी मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी नेत्रदीपक असे विद्यार्थी संचलन गीतगायन व विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विशेष प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. स्वागत प्राचार्य अल्बर्ट थरकन यांनी तर प्रास्ताविक प्राचार्या बिनो के पावलोस यांनी केले. सूत्रसंचालन आदिश्री गायकवाड व देव्यानी मोहिते तर आभार विहान सोनाज यांनी मानले.

शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल : प्रजासत्ताकदिनानिमित्त सुभेदार विजयकुमार सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. अध्यक्षा शीतलदेवी मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जितेंद्र माने देशमुख यांनी केले. यावेळी एच. डी. भोसले, शंकर गायकवाड, वनिता कोरटकर, सुषमा शिंदे उपस्थित होते. तमन्ना नाईकवाडी ज्योती घोडे, अनिता गायकवाड या सर्व शिक्षक व शिक्षणाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सदाशिवराव माने विद्यालय : सदाशिवराव माने विद्यालयात प्रजासत्ताकदिनानिमित्त नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. संचालक उत्कर्ष शेटे, डॉ. अमोल माने, गायत्री शेटे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक अमोल फुले यांनी केले. यावेळी एनसीसी, आरएसपी व स्काऊट पथकांनी नेत्रदीपक संचलन विष्णू चोरमले याच्या नेतृत्वाखाली केले. सामूहिक कवायत, जिम्नॅस्टिक, मैदानी खेळ, लेझीम सादर केले.
यावेळी रात्र शाळेचे मुख्याध्यापक संजय मुंगसे, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे, संजय राऊत, बलभीम काकुळे, कल्पना मोरे, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनशैल्य विद्यालय, गिरझणी : गिरझणी (ता. माळशिरस) येथे धनशैल्य विद्यालय व अकलूज येथील किडझी प्रशालेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस उपनिरीक्षक विशाल कदम त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील पहिल्या अत्याधुनिक शालेय टर्फ ग्राउंडचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी लिटिल आर्टिस्ट’ कला स्पर्धां, कराटे, लाठी-काठी, शौर्य खेळ व मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आभारअध्यक्ष डॉ. मनीष धनंजय गायकवाड यांनी मानले.
रत्नाई महिला संकुल अकलूज ः शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील महिला वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नाई संकुल येथे स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी नयना शहा, स्नेहल नरूळे, रूपाली मिसाळ, प्राचार्य डॉ. अमित घाडगे, मुख्याध्यापिका सुनीता वाघ उपस्थित होते. यावेळी एमसीसी, आरएसपी, गर्लगाईड, स्कूल बटालियन यांचे समृद्धी बाबर यांचे नेतृत्वाखाली संचलन केले.
अकलूज नगरपरिषद ः नगराध्यक्ष रेश्मा अडगळे यांच्या हस्ते, क्रीडा संकुल येथे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील व विभागीय कार्यालयात मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. शिवरत्न नॉलेज सिटी शिवामृत उत्पादक संघ शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट येथेही ध्वजवंदन उत्साहात करण्यात आले.

सापडलेली रक्कम परत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान
यशवंतनगर येथील महर्षी संकुलात उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी व अमरावतीचे विभागीय सहसंचालक सिद्धार्थ गायकवाड यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सभापती ॲड. नितीनराव खराडे, मुख्याध्यापक संजय गळीतकर उपस्थित होते. यावेळी सापडलेली मोठी रक्कम प्रामाणिकपणे परत देऊन प्रामाणिकपणाचा झेंडा फडकवणाऱ्या बारावी कला शाखेतील महेश विशाल काळे व ओम संजय सूर्यवंशी या विद्यार्थ्यांचा तसेच जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेले योगशिक्षक प्राध्यापक धनंजय देशमुख, त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेतील विजयपदाची हॅटट्रिक करणार मेघराज तानाजी तांबिले यांचासन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com