अकोल्यात कांदा किमान १००० व कमाल २७०० रुपये

अकोल्यात कांदा किमान १००० व कमाल २७०० रुपये
Published on

अकोल्यात १००० व ३००० रुपये

अॅग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दर्जेदार कांदा २५०० ते २८०० दरम्यान विकत आहे. दुय्यम प्रतिचा कांदा १००० ते १२०० दरम्यान प्रतिक्विंटल दराने विकल्या जात असल्याची माहिती बाजार समिती सुत्राने दिली. दररोज २५० ते ३०० क्विंटलची आवक होत आहे. यात बहुतांश माल हा स्थानिक भागातील आहे.
सध्या बाजारात कांद्याला मागणी असली तरी पुरवठा कमी असल्याने दर वाढलेले आहेत. चांगल्या प्रतिचा कांदा २५०० पासून २८०० पर्यंत विकत आहे. गुरुवारी (ता.१३) काही मालाला ३००० रुपयांचा दर मिळाला. कांद्याची किरकोळ विक्री ३५ ते ४० रुपयांदरम्यान सध्या होत आहे. नवीन कांद्याची आवक सुरु होईपर्यंत सध्या साठवणूक केलेला माल विक्रीला येत आहे. कांद्याचे आणखी काही दिवस असेच दर स्थिर राहण्याची शक्यता खरेदीदारांकडून व्यक्त केल्या जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com