

पान २
----------
अकोल्यात तुरीला कमाल
दर ९८७५ रुपयांपर्यंत
सरासरी दर पोचला साडेनऊ हजारांवर
अॅग्रोवन वृत्तसेवा
अकोला : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता.३) तुरीची १०९४ क्विंटल आवक झाली. तुरीला कमाल ९८७५ रुपये, तर किमान ८००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सरासरी दर ९५०० रुपये राहिला. बाजारातील एकूण आवकेमध्ये तुरीची आवक सर्वाधिक होती.
या वर्षात दुष्काळी परिस्थितीमुळे तुरीच्या पिकाचीही स्थिती चांगली नाही. उत्पादनाला मोठा फटका बसू शकतो. यामुळे तुरीच्या दरात गेले काही दिवस वाढीचा कल पाहायला मिळतो आहे. सध्या गेल्या हंगामातील साठवणूक केलेला माल विक्रीसाठी येऊ लागला. आगामी कमी उत्पादन, बाजारातील मागणी आणि तुलनेने आवक कमी यामुळे तुरीची दरवाढ होऊ लागली आहे.
बाजार समितीत सोयाबीनची २०७ क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला ५६०० ते ६११० रुपये, तर सरासरी ६००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. हरभऱ्याची २२२ क्विंटल आवक होऊन ६२०० ते ७१२० रुपये, तर सरासरी ६७३० रुपये दर मिळाला. पांढऱ्या हरभऱ्याची ६ क्विंटल आवक झाली असून ५२२० ते ६२०५ रुपये आणि सरासरी ५५०० रुपये दर मिळाला.
मुगाची ८ क्विंटल आवक होऊन ६००५ ते ७०४० रुपये, तर सरासरी ६८७२ रुपये दर मिळाला. उडदाला ९१२५ ते ९३०५ रुपये आणि सरासरी ९२१५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. उडदाची आवक ११ क्विंटल होती.
हळद सरासरी १५ हजार रुपये
बाजार समितीत हळदीची ४८ क्विंटल आवक झाली होती. किमान १३,८२५ ते कमाल १५,७५० रुपये दर मिळाला. सरासरी दर १५,०५० रुपये इतका होता. चिया सीडची १९ क्विंटल आवक झाली होती. १३,४५० ते १६,५५० रुपये दराने विक्री झाली. सरासरी १५,३५० रुपये दर मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.