Alandi Kartiki Wari : कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत रविवारपासून कडेकोट पोलिस बंदोबस्त; वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी वॉच टॉवर आणि गुप्त पोलिसांची नजर

Alandi Kartiki Wari Security Arrangements : कार्तिकी वारी आणि संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. वॉच टॉवर, नाकाबंदी, महिला पोलिसांची नियुक्ती आणि खासगी ड्रोनवर बंदी असेल.
Kartiki Wari in Alandi Begins on December

Kartiki Wari in Alandi Begins on December

esakal

Updated on: 

आळंदी : आळंदीत भरणाऱ्या कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये रविवारपासून (ता. २९) पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी तसेच मंदिर परिसरामधील संशयित हालचाली अथवा संशयित वस्तू, पिशवी आढळल्यास हात न लावता स्थानिक पोलिसांशी संपर्क करावा. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी देऊळवाडा, इंद्रायणी नदी घाट, मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा रस्त्यावर पोलिसांचे वॉच टॉवर उभारण्यात येणार असल्याची माहिती आळंदी पोलिसांच्या वतीने देण्यात आली.

Loading content, please wait...