

alandi dindi yatra security arrangement kartiki wari culture sant dnyaneshwar maharaj
आळंदी : आळंदीतील कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर, धर्मशाळा आणि मंगल कार्यालयांमध्ये महिलांची छेडछाड रोखण्यासह अनोळखी व्यक्तींना वास्तव्यास मनाई करण्याच्या स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा बसवून घेण्याचे आवाहनही पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.