अंगावर मिक्सर कोसळल्याने सोळू येथे कामगाराचा मृत्यू

अंगावर मिक्सर कोसळल्याने 
सोळू येथे कामगाराचा मृत्यू
Published on

आळंदी, ता. १९ : सोळू (ता. खेड) येथील एका कंपनीत शेडचे काम सुरू असताना खड्ड्यात काम करणाऱ्या कामगाराच्या अंगावर सिमेंट मिक्सर कोसळून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी निष्काळजीपणा केल्याबद्दल मिक्सर चालकावर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पप्पू कुमार लखन राम (वय ३६, रा. गोपालगंज बिहार ) असे मृत कामगाराचे नाव असून सागर लिंगप्पा पुजारी (वय २९, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मिक्सर चालकाचे नाव आहे. तर योगेंद्र कुमार लखन राम (वय २९) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी (ता. १६) मध्यरात्री दीडच्या सुमारास सोळू येथील ''एसआरए थर्मल प्रा. लि.'' कंपनीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पू राम हे कंपनीत शेडसाठी खोदलेल्या खड्ड्यात काम करत होते. यावेळी चालक सागर पुजारी याने सिमेंट मिक्सर (एमएच १४, एमएफ ७४१४) खड्ड्याच्या कडेला धोकादायक स्थितीत उभा केला. माती खचल्याने मिक्सर थेट खड्ड्यात काम करणाऱ्या पप्पू राम यांच्या अंगावर उलटला. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आळंदी पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com