आळंदी- वडगाव रस्त्यावर गटार वाहिनी फुटली
आळंदी, ता. ४ : देहूफाटा आणि पुणे- आळंदी रस्त्यावरील काळे कॉलनीमधील तुंबलेले ड्रेनेज अद्याप दुरुस्ती केले नाही. आता आळंदी- वडगाव रस्त्यावरील गटार वाहिनी फुटल्यामुळे मुख्य रस्त्यावर सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. मागील दोन दिवसांपासून ही समस्या कायम असताना संबंधित स्वच्छता विभागकडून कोणतीही ठोस कार्यवाही दुरुस्तीबाबत होत नसल्याचे चित्र आहे.
फुटलेल्या गटार वाहिनीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहत असून, वाहनांच्या वर्दळीमुळे हे पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. विशेषतः शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक यांना याचा मोठा फटका बसत आहे. हीच अवस्था मागील सहा महिन्यापासून आळंदी- पुणे रस्त्यावर काळे कॉलनीमध्ये आहे. ड्रेनेज तुंबत असल्याने दररोज पायी चालणाऱ्यांना शेजारून चारचाकी, दुचाकी वाहन गेले की अंगावर सांडपाणी उडत आहे. शाळकरी मुलांचे कपडे खराब होत आहेत. देहूफाटा भागातही असेच अधूनमधून सांडपाणी वाहत असते.
या परिसरातील फुटपाथ व पथारी मार्गावर अनधिकृत अतिक्रमण वाढले असून, त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच चालावे लागत आहे. त्यातच साचलेल्या घाण पाण्यामुळे परिसर दुर्गंधीने व्यापला आहे. व्यावसायिक व ये- जा करणाऱ्या नागरिकांसाठी ही परिस्थिती अत्यंत गैरसोयीची ठरत आहे.
स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेकडे तातडीने गटार वाहिनीची दुरुस्ती करून साचलेले पाणी काढण्याची मागणी केली आहे. तसेच, अतिक्रमण हटवून फुटपाथ मोकळे करावेत, अशीही मागणी नागरिक करीत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती धोकादायक असून, संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा परिसरात व्यक्त होत आहे.
07346
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

