

आळंदी, ता. २८ : नगरपरिषद हद्दीतील फेरीवाल्यांना ओळखपत्र, विक्री परवाना देणे आणि बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या मागणीसाठी फेरीवाला हॉकर्स महासंघाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मागण्या मान्य न झाल्यास गुरुवारी (ता. ३) नगरपरिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे.
याबाबत महासंघाचे उपाध्यक्ष मल्हार काळे यांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. काळे म्हणाले की, आळंदी नगरपरिषद हद्दीमध्ये फेरीवाले, पथविक्रेते यांना अद्याप नगरपरिषदेने ओळखपत्र दिलेले नाही, विक्री परवानाही दिलेला नाही. फेरीवाले, पथविक्रेत्यांना जागा निश्चित केलेली नाही. पंतप्रधान पथविक्रेता या नावाने ओळखपाटीही फेरीवाल्यांना दिलेली नाही. भाडे धोरण तसेच बायोमेट्रिक सर्वेक्षणाबाबत माहिती मागितली असता नगरपरिषदेकडून माहिती अधिकारात माहिती दिली जात नाही. यामुळे पथविक्रेते आणि फेरीवाल्यांसाठी धोरण निश्चित करून बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासाठी, तसेच माहिती अधिकारात योग्य माहिती द्यावी, यासाठी गुरुवारी (ता. ३) टपरीधारक आणि पथविक्रेत्यांचे उपोषण आंदोलन करणार आहे.
जाणीव संघटनेचे सुलतान शेख यांनी भाजी मंडईतील अतिक्रमणाच्या कारवाईवर आक्षेप घेत महिला विक्रेत्यांना हक्काची जागा देण्याची मागणी केली. दरम्यान, नगरपरिषदेच्या प्रकल्प अधिकारी वैशाली पाटील यांनी स्पष्ट केले की, ३६५ विक्रेत्यांची नोंदणी झाली असून, शहर फेरीवाला समितीने त्यांना मंजुरी दिली आहे. ओळखपत्राचे काम प्रगतीपथावर असून लवकरच त्याचे वाटप केले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.