
आळंदी : पावसाची पडणारी सर अन् मधूनच डोकावणारा सूर्यदेवता अशा दिवसभरातील आल्हाददायक वातावरणात इंद्रायणीच्या तीरी राज्यभरातून आलेल्या वैष्णवांच्या मेळ्याने दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणीत डुबकी मारून तीर्थ स्नानाचा आनंद घेणाऱ्या वारकऱ्यांचे चित्र आज दिसून आले. इंद्रायणीचे दोन्ही काठ आणि अवघी अलंकापुरीतील रस्ते ज्ञानोबा तुकारामांच्या नामघोषात मंत्रमुग्ध झाले असल्याचे शहराच्या कानाकोपऱ्यातून दिसत आहे.