

Jeep Overturns While Heading to Bhima Koregaon
Sakal
आळंदी : पेरणे फाटा ( भीमा कोरेगाव ता. शिरूर ) येथील विजयस्तंभ मानवंदना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांच्या जीप (एम एच 14, एल बी 3097) वरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून जीप पलटी झाली. या अपघातात कुरुळी (ता. खेड), पिंपरी चिंचवड आणि नांदेड भागातील सुमारे 28 अनुयायी जखमी झाले. अपघातात पुरुष महिलांसह कुरुळी येथील दीड वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. सर्व जखमींवर आळंदीतील ग्रामीण रुग्णालय, पिंपरी येथील वाय सी एम रुग्णालय आणि आळंदीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहे.