

Kartiki Wari in Alandi Begins on December
esakal
आळंदी : संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास आळंदीतील देऊळवाड्याच्या गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने मंगळवारी (ता. १ डिसेंबर) सुरुवात होणार आहे. सोहळ्यातील कार्तिकी एकादशीची मुख्य पहाट पूजा शुक्रवारी (ता. ४ डिसेंबर) तर माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा रविवारी (ता. ६ डिसेंबर) होणार आहे.