

Marriage Muhurats Sparse Due to Guru-Shukra Ast
Sakal
आळंदी : तुळशी विवाहानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. मात्र यंदाच्या वर्षी गुरू- शुक्राचा अस्त असल्याने मुहूर्त कमी आहेत. नोव्हेंबरमध्ये केवळ शेवटच्या आठवड्यात, डिसेंबरला केवळ चारच मुहूर्त, तर शुक्राच्या अस्तामुळे जानेवारीमध्ये मुहूर्तच नाहीत. ३ फेब्रुवारीपासून लग्नाचे मुहूर्त सुरू होत असल्याची माहिती आळंदीतील चिंतामणी ज्योतिष मंगल कार्यालयाचे पुरोहित संदीप कुलकर्णी यांनी दिली.