Security Overhaul: Alandi Sansthan Announces Major Operational Changes Post Donation Theft
sakal
आळंदी : आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात सेवकाने दानपेटीतील पैशांची चोरीची घटना दुर्दैवी असून देवस्थानच्या व्यवस्थापकासह अन्य तीन कर्मचाऱ्यांकडून चोरीच्या घटनेबाबत खुलासा मागवण्यात आला आहे. परिणामी देवस्थान ने सुरक्षा आणि आर्थिक नियंत्रण व्यवस्थेत मोठे बदल जाहीर केले आहेत. देवस्थानच्या अन्नदान आणि कॅश मोजणी विभागात कोणताही स्वयंसेवक नियुक्त केला जाणार नाही. मुख्य व्यवस्थापकांच्या उपस्थितीतच दानपेट्या उघडल्या जातील. संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग करण्यात येईल तसेच अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली रक्कम मोजली जाणार आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांची झडती घेण्यात येणार असल्याचेही आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आळंदी देवस्थाने भूमिका स्पष्ट केली.