Alandi Municipal Council : 'बुके ऐवजी बुक' देऊन नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत; आळंदी पालिकेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व!

Alandi Municipal Council: आळंदी नगर परिषदेत भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले असून, उपनगराध्यक्षपदी सुजाता तापकीर यांची तर स्वीकृत सदस्यपदी संदीप रासकर व राहुल चितळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
Unopposed Election of Alandi Deputy Mayor and Co-opted Councilors

Unopposed Election of Alandi Deputy Mayor and Co-opted Councilors

Sakal

Updated on

आळंदी : आळंदी नगर परिषदेत उपनगराध्यक्षपदी भाजपाचे सुजाता तापकीर आणि स्वीकृत सदस्य (नगरसेवक) म्हणून संदीप रासकर, राहुल चिताळकर या तिघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.संदीप रासकर यांची दुसऱ्यांदा आळंदी नगर परिषद मध्ये स्वीकृत सदस्यपदी निवड झाली. या निवडीनंतर विजयी उमेदवार यांची भाजपा समर्थकांनी फाटक्याची आतषबाजी आणि गुलालाची मुक्त उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्यासह भाजपाचे पंधरा नगरसेवक असल्यामुळे तिन्ही पदावर भाजपचा वरचस्मा दिसून आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com