

Alandi Municipal Council postponed the marriage hall sanitation tax decision until discussions with stakeholders and legal review are completed
Sakal
आळंदी : नगरपरिषद हद्दीतील मंगल कार्यालयांना प्रति विवाह विशेष स्वच्छता कर लागू करणे आणि वाहन पार्किंग व्यवस्था नसलेल्या मंगल कार्यालयांना देण्यात येणाऱ्या ना-हरकत प्रमाणपत्र/परवानगीबाबतचा निर्णय घेण्यापूर्वी नगरपरिषद हद्दीतील सर्व मंगल कार्यालयधारक तसेच धर्मशाळा चालक यांची स्वतंत्र संयुक्त बैठक आयोजित करण्याचे सभेने निश्चित केले. बैठकीमध्ये संबंधित घटकांची मते, सूचना व हरकती जाणून घेऊन सर्वसमावेशक चर्चा करण्यात येईल. त्यानंतर लागू असलेल्या नियम, कायदेशीर तरतुदींबाबत अंतिम धोरण निश्चित करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.