Alandi Municipal Counci
sakal
आळंदी : आळंदी नगरपरिषद नवनिर्वाचित नगरसेवक सध्या सत्कार समारंभात व्यस्त आहेत. मात्र उपनगराध्यक्ष आणि स्विकृत नगरसेवक निवडीबाबत कार्यवाही करण्याचे पत्र आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी नगराध्यक्षसह नगरसेवकांना सोमवारी (ता.२९) दिले. आणि नवनिर्वाचित नगरसेवकांची आता गटनेता,उपनगराध्यक्ष आणि दोन नामनिर्देशित (स्विकृत) सदस्याबाबत गुप्त बैठकांचा जोर सुरू झाल्याचे चित्र आहे.