
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी राज्यातून सुमारे सहा लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता असल्याने आळंदी पोलिसांच्यावतीने शहरामध्ये सर्व चौकांत पोलिस मदत केंद्र केले जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी बेवारसपणे ठेवल्या जाणाऱ्या संशयास्पद वस्तूंवर तसेच चोरांवर नजर ठेवण्यासाठी सुमारे दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. वारी काळात मंगळवार (ता. १७) ते शुक्रवार (ता. २०) स्थानिक नोकरदार आणि भाविक दिंडीकऱ्यांच्या वाहना व्यतिरिक्त अन्य प्रकारच्या वाहनांना आळंदीत प्रवेश करण्यास मज्जाव केल्याची माहिती आळंदी पोलिस प्रशासनाने दिली.