

Pune News
esakal
पुणे: जपानी कार्यपद्धतीचा अवलंब करीत पुणे रेल्वे प्रशासन पहिल्यांदाच पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील आळंदी स्थानकावर सुमारे ९७ कोटी खर्चून नवीन कोचिंग डेपो बांधणार आहे. येथे ‘एलएचबी’ (लिंक हॉफमन बुश) रेल्वेसह वंदे भारत एक्स्प्रेसच्या दररोज १०० डब्यांची देखभाल व दुरुस्ती केली जाणार आहे. लवकरच याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.