
वाखरी : सर्व पालखी तळांचे सर्वेक्षण करून परंपरेप्रमाणे तळावरील दिंड्यांच्या तंबूंच्या नियोजनाची उजळणी आळंदी संस्थानच्या वतीने होणार आहे. वारीतील वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी दिंड्यांमधील माणसांच्या संख्येनुसार वाहनपास वितरित करण्यात येणार असून, त्याचे नियोजन एकहाती संस्थानने एक खिडकीच्या माध्यमातून करावे, असा निर्णय संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी समाजाने केला आहे.