Alandi Spiritual Visit: आळंदीत चैतन्यमय वातावरण; संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेत बिट्टा यांचे गौरवोद्गार

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीस्थळातील अजानवृक्ष, सुवर्ण पिंपळाच्या दर्शनाने भारावलेले मनिंदरजीतसिंग बिट्टा; आळंदीतील चैतन्यमय वातावरणाचा गौरव, तरीही देशभर पोहोच न झाल्याची खंत
Bitta experiences spiritual energy at Alandi temple.

Bitta experiences spiritual energy at Alandi temple.

Sakal

Updated on

आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या आळंदी नगरीत आल्यानंतर मला प्रसन्न वाटले. मंदिरातील अजानवृक्षाजवळ खूप मोठे चैतन्य आहे. एवढे मोठे चैतन्यमय समाधीस्थळ,आणि नामांकित ठिकाण असूनही अद्याप देशातील बहुतांश लोकांपर्यंत पोहोचले नाही, हे आश्चर्य म्हणावे लागेल. समाजातील सर्व स्तरांपर्यंत या संत महतीची माहिती पोहोचणे गरजेचे असल्याचे अखिल भारतीय आतंकवाद विरोधी मोर्चाचे अध्यक्ष, पंजाबस्थित मनिंदरजीतसिंग बिट्टा यांनी आज आळंदीत सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com