students with parents
sakal
आळंदी - दिवेआगर येथील समुद्रात बुडून आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर, सहलीला गेलेल्या आळंदीतील विनर्स कोचिंग अकॅडमीचे उर्वरित 19 विद्यार्थिनी आणि 17 विद्यार्थी असे एकूण 36 विद्यार्थी आणि चार शिक्षक बसद्वारे आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आळंदीत सुखरूप पोहोचले. त्यावेळी आळंदी पोलीस ठाण्यात सर्व पालकांना बोलावून विद्यार्थ्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान आपल्या पाल्याला सुरक्षित असल्याचे पाहून पालकांच्या डोळ्यांच्या कडा काहीसा पानवल्या होत्या.