विधी संघर्षित बालकांवर आळंदी येथे गुन्हा दाखल

विधी संघर्षित बालकांवर आळंदी येथे गुन्हा दाखल

Published on

आळंदी, ता. १: कटरच्या सहाय्याने वार करून दोन अल्पवयीन मुलांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोन १७ वर्षीय विधी संघर्षित बालकांवर आळंदी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. प्रेम ज्ञानेश्वर जोंधळे आणि यथार्थ उमेश रावळ (रा. वडगाव रस्ता आळंदी) हे दोन १७ वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहेत. तर आळंदीतील वडगाव रस्त्यावर विधी संघर्षित बालकांवर आळंदी पोलिस ठाण्यामध्ये शनिवारी (ता. ३१) गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना शुक्रवारी (ता. ३०) रात्री आठच्या दरम्यान आळंदी वडगाव रस्त्यावरील ज्ञानसागर मंगल कार्यालय बाजूस झाली. याबाबतची फिर्याद प्रेम जोंधळे याने आळंदी पोलिस ठाण्यामध्ये दिली.
आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जोंधळे आणि त्याचा मित्र रावळ दोघेजण स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पाहून रात्री आठच्या सुमारास घराकडे जात होते. त्यावेळी वडगाव रस्ता येथे आरोपींनी फिर्यादी आणि त्याचा मित्रांना मारहाण केली आणि त्यांच्यावर कटरच्या साह्याने वार केले. यामध्ये फिर्यादी आणि त्याच्या मित्राच्या हाताला पायाला इजा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com