आळंदी शहरातील वाहतूक कोंडी फुटली

आळंदी शहरातील वाहतूक कोंडी फुटली

Published on

आळंदी, ता. ३ : येथील नगरपरिषद चौकातील वाहतूक कोंडी आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना चाप लावण्यासाठी नगरपरिषद व पोलिसांनी पक्क्या दुभाजकांऐवजी ''डेलीनीएटर'' (मर्यादा किंवा बाह्यरेखा दर्शवणारा) बसविले आहेत. या प्रयोगामुळे चौकातील बेशिस्त वाहतुकीला लगाम बसून वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे.
नगरपरिषद चौकात अरुंद वळण आणि रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे सातत्याने कोंडी होत होती. विशेषतः विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला होता. यावर उपाय म्हणून पोलिसांनी सुरुवातीला बॅरिकेड्सचा वापर केला. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर आता नगरपरिषदेने पुढाकार घेऊन कायमस्वरूपी डेलीनीएटर बसविले आहेत. यामुळे विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. आळंदी शहर पोलिसांनी सांगितले की गुरुवार, रविवार आणि लग्नसराईच्या काळात आळंदीत मोठी गर्दी असते. यावेळी रस्त्यावर उभी राहणारी वाहने आणि रिक्षांमुळे सर्वसामान्यांना त्रास होतो. यापुढे प्रदक्षिणा मार्गावर अनधिकृतपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील टप्प्यात शहरात सम-विषम पार्किंग व्यवस्था लागू करण्याचे नियोजन आहे.


आळंदीमध्ये वाहनचालकांमध्ये शिस्त आणण्यासाठी तसेच बेशिस्तपणे वाहन वळविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी हा प्रयोग राबविला. यामुळे वाहनांची दिशा स्पष्ट राहून अपघाताची शक्यता घटत आहे. रस्त्यावर शिस्तबद्ध वाहतूक प्रवाह सुरू झाला आहे. पुढील टप्प्यात लवकरच सम-विषम पार्किंग व्यवस्था केली जाईल.
- प्रशांत कुऱ्हाडे, नगराध्यक्ष, आळंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com