
Pandharpur Wari: आषाढी वारीच्या निमित्ताने आळंदीत आलेल्या एका वारकऱ्याला इंद्रायणी नदीत वाहून जात असताना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकाने तातडीने बचावकार्य करत सुरक्षित बाहेर काढले. अमोल तुकाराम राठोड (वय ४०, रा. यवतमाळ) असे या वारकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.