आळंदी - टाळ-मृदंगाचा टिपेला पोहोचलेला गजर...जागोजागी सुवांसिनीनी केलेली ओवाळणी... रांगोळ्याच्या पायघड्या.... श्री ज्ञानदेव तुकारामांचा अखंड नामघोष... अन् जल्लोषपूर्ण वातावरणात हजारो हातांनी ओढला जाणारा आकर्षक विद्युत रोषणाई केलेला लाकडी रथ... अशा चैतन्यमय वातावरणातील बुधवारी (ता. २७) सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि ‘पुंडलिक वरदाऽ’च्या जयघोषात नगरप्रदक्षणेसाठी लाकडी रथ ओढण्यात आला.