

आळंदी, ता. २४ : येथील इंद्रायणी नदीपात्रात ३५ ते ४० वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २२) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
केळगाव येथील आकाश पुंजाजी पझई रविवारी (ता. २१) सिद्धबेट भागातून जात असताना त्यांना नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला. सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेचा पुढील तपास आळंदी पोलिस करत आहेत.