विज्ञान प्रदर्शनात ''अल्कोहोल डिटेक्टर'' प्रयोग प्रथम

विज्ञान प्रदर्शनात ''अल्कोहोल डिटेक्टर'' प्रयोग प्रथम

Published on

......
सचिन शिंदेच्या उपकरणास प्रथम क्रमांक
......
बार्शी शहर : भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांना नोबल पारितोषिक मिळाले म्हणून २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सोजर इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता सहावीतील विद्यार्थी सर्वज्ञ सचिन शिंदे याने तयार केलेल्या ‘अल्कोहोल डिटेक्टर’ उपकरणास प्रथम क्रमांक मिळाला. या प्रदर्शनात सर्वज्ञ याने सद्यस्थितीला वाहन चालवताना उपयुक्त असणारे ‘अल्कोहोल डिटेक्टर किट’ तयार केले आहे. या किटबाबत माहिती देताना त्याने सांगितले की, जर कोणी चालक मद्यपान किंवा नशापान करून गाडी चालवण्याचा प्रयत्न करु लागला तर हे किट त्याचे अल्कोहोल डिटेक्ट करते. आणि त्या गाडीचे इंजिन आपोआप बंद होते. त्यामुळे संभाव्य अपघात या किटमुळे टाळता येवू शकतात. साधारणपणे ३ ते ४ फूट अंतरावरून हे किट अल्कोहोल डिटेक्ट करू शकते. याचे फायदे सांगताना तो म्हणाला की, हे किट अत्यंत उपयुक्त आणि परिणामकारक असून ते आपल्या गाडीमध्ये सहजपणे बसविता येणार असून, खर्च कमी आणि अपघात टाळण्याची हमी हे किट आपणास देते. मद्य पिऊन वाहन चालवताना होणारे अपघात टाळण्यासाठीच हे उपकरण महत्त्वाचे आहे. इयत्ता पाचवी ते सातवी गटातून सर्वज्ञ याने तयार केलेल्या प्रयोगास प्रथम क्रमांक मिळाला असून त्यास शाळेचे मुख्याध्यापक संदीप पोळ यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. यापूर्वीही सर्वज्ञ याने अत्यंत कमी खर्चात टाकाऊ पासून टिकाऊ असा थंडावा देणार कुलर बनवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com