Video : पहा, पुण्यात मद्यधुंद महिलेने नेमके काय केले?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

बावधन येथील रामनगर परिसरात मद्यधुंद महिलेने सोसायटीच्या गेटजवळ काही गाड्यांना धडक दिली. त्यानंतर तेथे पार्क केलेल्या एका कारला वारंवार ठोकर देत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. मद्यधुंद असलेल्या या महिलेने तेथे गोळा झालेल्या नागरिकांच्या अंगावरदेखील कार घालण्याचा प्रयत्न केल्याचा दावा तक्रारकर्त्यांनी केला आहे.

औंध : बावधन येथील रामनगर परिसरात मद्यधुंद महिलेने सोसायटीच्या गेटजवळ काही गाड्यांना धडक दिली. त्यानंतर तेथे पार्क केलेल्या एका कारला वारंवार ठोकर देत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. मद्यधुंद असलेल्या या महिलेने तेथे गोळा झालेल्या नागरिकांच्या अंगावरदेखील कार घालण्याचा प्रयत्न केल्याचा दावा तक्रारकर्त्यांनी केला आहे.

स्वाती सौरभ मिश्रा (रा. रामनगर कॉलनी, बावधन) असे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी दर्श सुभाष चावला (वय २८, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिश्रा पहाटे त्यांच्या डस्टर कारमधून घरी आल्या असता सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ एक नॅनो कार लावलेली होती. सोसायटीत प्रवेश करतांना त्यांची नॅनो कारला धडक बसली. त्यानंतर रागात त्यांनी नॅनो कारला वारंवार धडका दिल्या.यामुळे नॅनो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर त्यांनी घरी जातांना रस्त्यात दिसणाऱ्या अनेक वाहनांचे नुकसान केले. तसेच नॅनो कारला ठोकरल्यानंतर काही वेळाने त्या पुन्हा तेथे आल्या. या वेळेस त्यांनी दुसरी कार आणली होती. पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर.आर.दिवटे हे तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An alcoholic woman hit cars and use slang to people in Pune